-->
विशेष

जयहिंद महाराष्ट्र राज्य कल्याणकारी संघटनेचा उपक्रम; घडशी समाजाची कुलदेवता ताईआई मंदिर बांधकामाचा शुभारंभ

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

जयहिंद महाराष्ट्र राज्य कल्याणकारी संघटना व साळुंखे पाटील परिवाराकडून घडशी गल्ली येथे पूर्वजाचे पुरातन ताईआई मंदिर बांधकामाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व साळुंखे परिवाराकडून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी वर्गणी गोळा करून मूळ पुरुषाकडून आलेले दैवत ताई आई ही सर्व समाजाची असून त्याचा मान साळुंखे परिवाराकडे असल्याने पूर्वजांचे अपुरे राहिलेले स्वप्न या पिढीतील सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या कुळातील कुलदेवता म्हणून स्वीकार करून नवीन बांधकामास सुरुवात केली आहे. सर्व साळुंखे परिवार या कार्यक्रमास बहुसंख्यने उपस्थित होते. तसेच मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम करण्यात आला.

 

घडशी समाजाचा मूळ व्यवसाय देवाची, श्रीची सेवा करणे, देवाची सकाळी आरती करणे, नगारा ढोल वाजवणे, श्री सिद्धनाथ व जोगाई माता वाजत गाजत आणणे, सेवेकरी नाथाच्या पावतासमोर भक्तांचे गाऱ्हाणे ऐकून घेऊन त्यांना सुख शांती लाभो अशी विनंती श्री सिद्धनाथाला करणे. घडशी समाजाच्या सेविकाराला तसेच गुरव, घडशी, बारा बलुतेदार या सर्वांना काळभैरवनाथाची पूजा करण्याचा मान आहे.

 

श्री क्षेत्र खरसुंडी सिद्धनाथ जोगाई माता यांचे दर्शन घडशी समाजाचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील, शोभा तुकाराम साळुंखे पाटील, लालासाहेब साळुंखे पाटील यांनी घेतले. यावेळी वसंत साळुंखे, भरत साळुंखे, अधिक साळुंखे, रामकृष्ण हरी साळुंखे, महेश साळुंखे, दीपक भोसले, सागर साळुंखे, रमेश साळुंखे, योगेश भोसले हे सर्व उपस्थित सेवेकरी होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close