-->
महिलाविषयकविशेष

आगनमळा अंगणवाडीच्या मदतनीस कलावती चव्हाणके यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

 

माय मराठी न्यूज नेटवर्क 

 

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सिन्नर प्रकल्प २ मधील वडांगळी बीटा तील आगनमळा अंगणवाडी केंद्र येथील मदतनीस सौ. कलावती आनंदा चव्हाणके यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. वडांगळी बीट च्या मुख्य सेविका श्रीमती सविता होलगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

 

सौ. कलावती चव्हाणके यांनी आगनमळा अंगणवाडी केंद्रात मदतनीस म्हणून ४२ वर्षे सेवा केली. या प्रसंगी वडांगळी बीट च्या माजी मुख्य सेविका श्रीमती उषा सरोदे मॅडम याही उपस्थित होत्या. तसेच प्रामुख्याने संपूर्ण वडांगळी बिटातील अंगणवाडी सेविकांनीही या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती.

 

यावेळी कलावती चव्हाणके यांच्या मुली, मुले, नातवंडे त्याचबरोबर सगळे आप्तेष्ट, सगेसोयरे ही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आगणमळा अंगणवाडी च्या सेविका श्रीमती माया भारत चव्हाणके यांनी केले. अशा पद्धतीने कलावती चव्हाणके यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close