-->
करमाळा

कडक उन्हात अल्तमश शेखने पूर्ण केला रोजा; परिसरातून कौतुक

 

करमाळा | प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील खाटिक गल्ली येथील अल्तमश अशपाक शेख (घोणे) याने कडक उन्हाळ्यात रोजा पूर्ण करून अल्पवयात संयम आणि श्रद्धेचा आदर्श घालून दिला आहे.

 

लहान वयातही धार्मिक आस्था जपत अल्तमशने दिवसभर उपवास केला. उन्हाची तीव्रता असतानाही त्याने शांतपणे आणि संयमाने रोजा पूर्ण केल्याने परिसरात त्याचे कौतुक होत आहे. आई तसेच वडील अशपाक शेख यांच्याकडे अल्तमशने रोजा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंबियांच्या सहकार्याने त्याने पूर्ण दिवस उपवास पाळत श्रद्धेने रोजा पूर्ण केला.

 

रमजान महिना हा संयम, त्याग आणि प्रार्थनेचा संदेश देणारा मानला जातो. अशा पवित्र महिन्यात अल्तमशने दाखवलेली चिकाटी इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अल्तमशने करमाळा येथील जामा मशिदीत रोजा इफ्तार केला. यावेळी मौलाना अन्वर शेख, इस्रायल शेख, इम्रान शेख, अफजल शेख आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close