-->
करमाळामाहिती विषयक

संगोबा मंदीराजवळ पाण्यात अडकले ९० नागरिक; बचावकार्य सुरु

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

 

सीना नदीला आलेल्या महापुरामुळे संगोबा (ता.करमाळा) येथील श्री आदिनाथ मंदिराला पूर्ण पाण्याचा वेढा पडला असून या मंदिरात निलज, बोरगाव परिसरातील सुमारे ९० नागरिक अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोट पाठवण्यात आली होती, परंतु ही बोट लोखंडी पुलाजवळ अडकली. बोट काढण्यासाठी ट्रॅक्टर पाठवला, मात्र तो सुद्धा पाण्यात बंद पडून अडकला आहे.

 

बचाव कार्याच्या ठिकाणी तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम साहेब, पोलीस प्रशासन आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित असून खांबेवाडी, करंजे, धायखिंडी व परिसरातील सरपंच तसेच ग्रामस्थही बचाव कार्यात मदतीस पुढे आले आहेत.

 

अडकलेली बोट आणि ट्रॅक्टर सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून मंदिरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि स्थानिकांचे प्रयत्न सुरु आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close