-->
करमाळाकृषी विषयक

उस शेतीतील आधुनिक कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) तंत्रज्ञान चर्चासत्राचे आयोजन

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

जातेगाव, (ता. करमाळा) येथील भैरवनाथ मंदिर येथे उस शेतीतील आधुनिक कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित चर्चासत्राचे आयोजन बारामती ऍग्रो लि. या साखर कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. २६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.

 

या चर्चासत्रामध्ये उस शेतीतील नवे बदल, सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञान व AI चा शेतीतील वापर यावर सखोल चर्चा केली जाणार आहे. कार्यक्रमात बारामती ॲग्रोचे चेअरमन मा. श्री. राजेंद्र दादा पवारसो, व्हा. चेअरमन मा. श्री. सुभाष आबा गुळवे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे कृषीतज्ञ मा. श्री. संतोष करंजे तसेच बारामती ॲग्रोचे उस विकास विभाग प्रमुख मा. श्री. प्रविण भापकर हे उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

 

या कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून देणे, उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी नव्या उपाययोजना सुचवणे व ऊस शेती अधिक लाभदायक बनवणे हा आहे.

 

जातेगाव व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून AI तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close