-->
आरोग्यकरमाळा

रावगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

रावगाव (ता. करमाळा) येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाएनजीओ फेडरेशन व नवभारत प्रतिष्ठान, रावगाव यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रतिमा पूजन मान्यवर बबन पाटूळे व हनुमंत रासकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर योग गुरू महेंद्र शिंदे यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना योग्य प्रकारे योग कसा करावा याचे मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य अधिकारी अपेक्षा शिंदे यांनी “आरोग्यामध्ये योगाचे महत्त्व” या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.

 

या योग शिबिरात नवभारत प्रतिष्ठानचे पदाधिकारी, हनुमंत रासकर सर, सरडे सर, प्रताप राऊत, लक्ष्मण पवार, गणेश जाधव, हर्षद पवार, रामदास कांबळे, नवनाथ वणवे, माणिक शिंदे, आशा वर्कर दीपाली पवार, आरोग्य सहाय्यक डोळस तसेच पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश कांबळे, राहुल पवार, हर्षद पवार व अमित कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष भास्कर पवार यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close