
प्रतिनिधी/नाशिक (माय मराठी न्यूज नेटवर्क)


मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सिन्नर २ अंतर्गत आदर्श ECCE अंगणवाडी केंद्र वडांगळी १ या अंगणवाडीचे उद्घाटन नाशिक जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल मॅडम यांच्या हस्ते मार्च २०२५ मध्ये झाले होते. सदर आदर्श अंगणवाडी केंद्र झाल्यापासूनचे अंगणवाडी केंद्रातील बालकांवर व पालकांवर होणारे बदल याची डॉक्युमेंटरी शूटिंग युनिसेफचे नितीन वसईकर सर, त्यांचे सहकारी ऋषिकेश सर व प्रभारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन शिंदे सर यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. ३ जून रोजी पार पडली.
https://youtube.com/shorts/Rpbwynhlug0?feature=shared
यावेळी आदर्श अंगणवाडी केंद्राची अंतर्गत व बाह्य रचना तसेच मुलांमध्ये झालेले बदल याची डॉक्युमेंटरी शूटिंग करून जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांची मुलाखत घेण्यात आली. AI बेस अंगणवाडीचे मुलांच्या उपस्थितीवर व पालकांच्या मनस्थितीवर कसे परिणाम होतात, अंगणवाडीतील विविध खेळाचे साहित्य, त्यातून होणारा शारीरिक व मानसिक विकास त्याचप्रमाणे उच्च दर्जाचे पूर्व प्राथमिक शिक्षण अगदी खेडेगावातील मुलांनाही मिळत असल्याने पालकवर्ग देखील अंगणवाडी माध्यमाची निवड करतात. तसेच आजूबाजूच्या अंगणवाड्या देखील आदर्श अंगणवाडी आपल्याही मुलांना बघण्यास मिळावी यासाठी छोटेखाणी शैक्षणिक सहल घेऊन येतात असे शिंदे सर यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.
या प्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी गांगुर्डे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी श्री मोरे साहेब, वडांगळी बीट च्या पर्यवेक्षिका श्रीमती सविता होलगडे मॅडम, वडांगळीच्या अंगणवाडी सेविका गीता खुळे तसेच वडांगळी बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका हजर होत्या. सचिन शिंदे सर यांनी सेविका यांचा पोषण ट्रॅकर बाबत आढावा घेऊन कामकाज वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.




