-->
करमाळाविशेष

पत्रकारीता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिनेश मडके यांचा महाराष्ट्र महागौरव‌ पुरस्कार‌‌‌ सोहळ्यात सन्मान

१२ हजार पत्रकाराची पॉलीशी करणार- नामदार चंद्रकांत दादा पाटील

 

करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज नेटवर्क)

 

डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने राज्य स्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम पुणे येथे संपन्न झाला. यामध्ये राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्कर्त्यांसह करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष, राज्य कार्यकारिणी सदस्य पत्रकार दिनेश मडके यांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार सोहळ्यात ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.

 

२५ मे रोजी पुणे येथील जे डब्लू मरियट पंचतारांकित हाँटेलमध्ये डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा महागौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आयुष्यमान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीपकुमार सपाटे, ए बी पी माझा च्या संपादिका सरिता कौशीक, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोष सूर्यवंशी, राज्य संघटक तेजस राऊत, राज्य समन्वयक इकबाल शेख, पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रशांत कटारे, राष्ट्रीय संघटक राजू वाघमारे, सचिव दीपक नलवडे, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार सुतार, सचिव महेश कुगावकर, सहसचिव केतन महामुनी, राज्य संघटक श्यामल खैरनार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य समन्वयक गणेश बोतालजी, राज्य प्रसिद्ध प्रमुख धीरज शेळके, सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण नागणे सर्व माध्यमाचे प्रतिनिधी पत्रकार व मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते. राज्यातील विविध जिल्हयातून उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांसह करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांना देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 

यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकाराच्या अडचणी आणि व्यथा शासनापर्यंत पोहचवून चंद्रकांत दादानी सर्वोतोपरी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर समाजासाठी काम करणाऱ्या पत्रकारांच्या कुटुंब घटकासाठी उचीत काम करणे गरजेचे असुन या संदर्भात शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी नक्कीच हे काम करेल असे उपस्थित नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या मनोगतातुन स्पष्ट केले. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या सुमारे बारा हजार पत्रकारांची आपण विमा पॉलिसी करून त्यांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ मिळून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डिजीटल मिडीया हा पुढील काळाचा पर्याय असून त्यासाठी त्यांना शासन सहकार्य मिळवून देणार असल्याचे यावेळी मंत्रालयीन वार्ताहर प्रमुख दिलीप सपाटे यांनी सांगितले. डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या संघटनेच्या कार्यात सर्वांनी आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकाराच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आरोग्य वैद्यकीय सुविधांबरोबर मुलाचे शिक्षण व विविध मदत कार्यासाठी काढण्यात आलेल्या प्रतिबिंब या प्रतिष्ठानच्या लोगोचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल व यशस्वी संघटन केल्याबद्दल करमाळा तालुका अध्यक्ष दिनेश मडके यांना सन्मानित करण्यात आले आहे. डिजिटल मीडियाचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य राजा माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे काम मोठ्या जोमाने करणार असल्याचे दिनेश मडके यांनी सांगितले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close