-->
आरोग्यकरमाळासामाजिक

संगोबा येथील आरोग्य शिबिरात २६०० रुग्णांची तपासणी; जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य रुग्णांचा आधार- डॉक्टर श्रद्धा जवंजाळ

 

 करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री क्षेत्र संगोबा येथे होणाऱ्या यात्रेत लाखो शिवभक्त सहभागी होतात. या यात्रेतच मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल करमाळा च्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व मोफत औषधे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर दोन दिवस चालणार असून आज बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी तब्बल २६०० रुग्णांची तपासणी करून लाखो रुपयांची औषधे मोफत वाटण्यात आली.

 

या शिबिरात गरुड कॅन्सर हॉस्पिटल अहमदनगर, गांधी फाउंडेशन कराड येथील नेत्रचिकित्सालय, सुविधा हॉस्पिटल बार्शी, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय करमाळा, जिल्हा वैद्यकीय अधिकारी सोलापूर आदी जवळपास सात नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी केले.

 

या शिबिरासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. गौतम रोडे, गुळसडी येथील उद्योजक अजिंक्य पाटील, शहरप्रमुख संजय शीलवंत, वैद्यकीय कक्षप्रमुख दीपक पाटणे, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष अंकुशराव जाधव, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण, जेऊर शाखाप्रमुख संजय जगताप, पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे, आजिनाथ वस्ताद कोळेकर, गंगुबाई शिंदे नर्सिंग कॉलेजचे प्रिन्सिपल सोमनाथ जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे आदी जण उपस्थित होते.

 

मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर ओंकार उघडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अल्प दरात सर्व प्रकारची सेवा देणार व सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया अल्प दरात करणार असल्याचा विश्वास दिला.

 

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, या पुढील काळातही करमाळा तालुक्यातील होणाऱ्या प्रत्येक यात्रा मध्ये अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून करून एकनाथ शिंदे यांची रुग्ण सेवा प्रत्येक घराघरात करमाळा तालुक्यात पोहोचणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय वैद्यकीय उपचारासाठी आधार ठरत असून वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात २०२५ हीरक आरोग्य वर्ष साजरे करून महाराष्ट्रातील कोट्यावधी रुग्णांना मोफत उपचार केले जाणार असून ही संकल्पना अभिमानास्पद आहे.

डॉ. श्रद्धा जवंजाळ


गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कराड यांच्यावतीने नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटण्यात आले. ज्यांच्यावर डोळ्याचे शस्त्रक्रिया करण्याचे आहेत त्यांना मोफत शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे. तसेच लेन्स ही मोफत दिली जाणार आहेत.


ऊपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे OSD मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील जनतेला रुग्णसेवा मिळत आहे. मुंबईत राहून सुद्धा ते करमाळा तालुक्यातील जनतेची काळजी करतात ही गोष्ट कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

शिल्पाताई ठोकडे, तहसिलदार, करमाळा.


        हे शिबीर यशस्वी करण्यासाठी कमलादेवी ब्लड बँक, गंगुबाई शिंदे नर्सिंग कॉलेज, गंगुबाई शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर या संस्थेचे कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close