-->
विशेषसामाजिक

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू 

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीने अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा युवकांचे ह्रदयसम्राट मा. श्री. शिवतेजसिंह (शिवबाबा) मोहिते- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी माळेवाडी (अकलूज) येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सौ. देवन्या शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

यावेळी अंधश्रद्धा निर्मुलनचे व्याख्याते व वनस्पती शास्त्र विभागाचे माजी प्रा. रामलिंग सावळजकर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने, ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे, पत्रकार लक्ष्मीकांत कुरूडकर, पत्रकार संजय लोहकरे, सुनील कांबळे, विशाल साठे, सचिन झेंडे, अनुराग खंडागळे, पृथ्वीराज कारंडे आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close