प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सोमनाथ खंडागळे यांची चौथ्यांदा निवड

प्रतिनिधी/माळशिरस (माय मराठी न्यूज)


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सा. सुवर्णयुग या वृत्तपत्राचे पत्रकार श्री सोमनाथ खंडागळे यांची चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे. सोमनाथ खंडागळे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून मागील कार्यकाळात उत्तम कामगिरी बजावली असल्याने संघटनेने त्यांची फेरनिवड केली आहे. सोमनाथ खंडागळे संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्नशील करणार आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील, राज्य संघटक अनिल राठोड, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष सचिन जाधव, पी जी कोटूरवार, पंकज वानखेडे, विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदे, महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण संघटक श्रीराम कदम, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड.रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दि. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्यावतीने खूप खूप शुभेच्छा!
श्री. डी. टी. आंबेगावे, संस्थापक अध्यक्ष, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य.




