-->
करमाळाराजकिय

उजनी कुकडी उपसा सिंचन योजना राबवून तालुक्याच्या विकासाला गतिमान करणार- आ. संजयमामा शिंदे

 

प्रतिनिधी/संजय साखरे (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील पूर्व भागाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली दहिगाव उपसा सिंचन योजना राबवून आपण यशस्वीपणे चालून दाखवली आहे. करमाळा तालुक्याच्या उर्वरित भागासाठी वरदान असलेली उजनी-कुकडी उपसा सिंचन योजना राबवून करमाळा तालुक्याचा विकासाला गतिमान करणार असल्याचे प्रतिपादन करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे. आज ४ ऑक्टोंबर रोजी राजुरी (ता. करमाळा) येथे 33/11 केव्ही विज उपकेंद्राच्या निर्मितीचा भूमिपूजन समारंभ व हॅम अंतर्गत ७१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे भूमिपूजन तसेच राजुरी येथील आरोग्य उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा आ. संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

 

राजुरी येथील वीज उपकेंद्राची राजुरी ग्रामस्थांची मागणी होती. २०२२ साली आपण राजुरीचे ग्रामदैवत बाळनाथ स्वामी मंदिरात वीज उपकेंद्र निर्मितीचा संकल्प केला होता. त्यानुसार आज या उपकेंद्राचे भूमिपूजन झाले असून मार्च २०२५ अखेर हे काम पूर्ण होणार आहे. यावेळी पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, २०१९ साली आपण आमदार झाल्यापासून तालुक्यात जवळपास तीन हजार कोटीची विकास कामे केली असून दहीगाव उपसा सिंचन योजनेची सुधारित सुप्रीमा, पोंधवडी चारीचे अपूर्ण राहिलेले काम व अस्तरीकरण पूर्ण केले आहे. येणाऱ्या काळात उजनी कुकडी उपसा सिंचन योजना राबवून तालुक्याचा संपूर्ण भाग बागायती करायचा आहे.

 

करमाळा तालुक्यातील विजेची समस्या सोडविण्यात आपण आमदारकीच्या कालावधीत प्राधान्य दिले असून जिथे गरज असेल तेथे एडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवला. तालुक्यातील आवाटी, रायगाव व राजुरी या तीन ठिकाणी नवीन वीज उपकेंद्राची निर्मिती केली. हॅम योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या २७१ कोटीच्या रस्त्यामुळे तालुक्यातील २० गावे पक्क्या सिमेंटच्या रस्त्याने एकमेकांशी जोडली जाणार आहेत. आपण करमाळा तालुक्यातील जनतेला कोणती खोटी आश्वासने न देता काम पूर्ण करून दाखवण्यावरच आपला भर असतो असेही ते शेवटी म्हणाले.

 

यावेळी व्यासपीठावर आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रकांत सरडे, वामनदादा बदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, ॲड. अजित विघ्ने, सोलापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक अशोक पाटील, राजेंद्र बाबर, विवेक येवले, सूर्यकांत पाटील, सुहास गलांडे सर, तानाजी बापू झोळ, गौरव झांजुर्णे, विलास दादा पाटील यांच्यासह राजुरी परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी सुहास गलांडे, सूर्यकांत पाटील, गौरव झंजुर्णे, राजेंद्र बाबर, आप्पासाहेब निरगुडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार जगताप यांनी केले. आभार संतोष कुलकर्णी यांनी मानले तर सूत्रसंचालन संजय साखरे यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close