-->
करमाळाराजकिय

करमाळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक निधी देणार; आ.संजयमामा शिंदे यांची ग्वाही

 

करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

करमाळा शहराला अनियमित पाणीपुरवठा व अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसह सर्व विभाग प्रमुखांची बैठक आज दि. २० सप्टेंबर रोजी घेतली. करमाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहीगाव पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाडामुळे वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. यावरती कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी लवकरच आवश्यक निधी आपण उपलब्ध करून देऊ असे आ. संजयमामा शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

करमाळा नगर परिषदेला पाणीपुरवठा करण्यासाठी १९९३ साली सुरू झालेल्या योजनेसाठी दहीगाव येथून पाणी उपसा करणारे २४० अश्वशक्तीचे दोन व २०० अश्वशक्तीच्या विद्युतपंपांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होणे, शहरातील मारवाड गल्ली, राशीन पेठ, सिध्दार्थ नगर, भिमनगर, किल्ला वेस, मेन रोड, श्री कृष्णाजी नगर या भागात सन १९९८ साली CI पाईप लाईन टाकलेल्या आहेत. तरी या पाईप लाईन कालबाह्य झालेले आहेत. शहरातील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही व वारंवार तक्रारी येत आहेत. त्याकरिता सदरील पाईप लाईन DI किंवा HDEP बदलने, शहरांतर्गत स्वच्छता करणे, शहर विकास आराखडा मंजूर करून घेणे यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.

 

या बैठकीसाठी करमाळा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन तपसे, आकाश वाघमारे बांधकाम अभियंता, समीर नदाफ लेखापाल, शशांक भोसले नगर अभियंता, विनोद राखुंडे अंतर्गत लेखा परीक्षक, पियुष शिंपी आस्थापना प्रमुख, कमलाकर भोज, पाणीपुरवठा विभाग हे उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close