-->
करमाळाविशेष

राजस्थान उत्तरप्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया पत्रकार संपादकांना शासन दरबारी न्याय मिळवून देणार- आ.संजयमामा शिंदे

 

करमाळा/प्रतिनिधी (अंगद भांडवलकर)

 

राजस्थान, उत्तरप्रदेश राज्याच्या धर्तीवर करमाळा तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकार संपादकांना शासन दरबारी ‌मान्यता देऊन न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मत करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले. करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्यावतीने आ. संजयमामा शिंदे यांना ‌डिजिटल मीडियाचे पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासंदर्भात विविध मागण्यांचे ‌निवेदन डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या आदेशानुसार देण्यात आले.

 

यावेळी डिजिटल करमाळा तालुका डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटना तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, उपाध्यक्ष शितलकुमार मोटे, सचिव नरेंद्रसिंह ठाकुर, सहसचिव सूर्यकांत होनप, हर्षवर्धन गाडे, तुषार जाधव, संघटक अंगद भांडवलकर, खजिनदार ॲड. सचिन हिरडे, राजू सय्यद, राहुल रामदासी, सागर गायकवाड आदिजण उपस्थित होते.

 

करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणीपासून शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला, बांधकाम कामगार, शिक्षक, शासकिय, निमशासकिय कर्मचारी अगदी रिक्षा व टॅक्सी चालकांपर्यंतच्या विविध घटकांसाठी अनेक योजना राबविल्या असून सर्वांना न्याय दिला आहे. मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा पत्रकार दुर्लक्षित राहीला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी धोरण ठरविण्याची गरज आहे. महानगरातील झोपडपट्ट्या व उच्चभ्रू वर्गापासून ते थेट राज्यातील वाड्या-वस्त्यांवर प्रभावीपणे पोहोचलेल्या डिजिटल मिडिया पत्रकारांकडे मात्र आपले दुर्लक्ष झाले आहे. देशातील अनेक राज्यांनी आपले डिजिटल मिडिया धोरण जाहीर करून डिजिटल पत्रकारांना दिशा दिली आहे.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांनीही दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी उत्तर प्रदेशचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करून तिथल्या डिजिटल मिडियाला आधार दिला. राजस्थान व उत्तर प्रदेशच्या धर्तीवर त्यापेक्षाही व्यापक धोरण युध्दपातळीवर आपण जाहीर करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी आमची आपणाकडे आग्रही मागणी आहे. तसेच विधीमंडळ अधिवेशनात सरकारने जाहीर केल्यानुसार वृध्द पत्रकारांना तातडीने दरमहा २० हजार रुपये सन्मान मानधन सुरु करावे. करमाळा तालुक्याचे आमदार म्हणून पत्रकाराच्या कल्याणासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन आमच्या मागण्या मान्य करुन राज्यातील पत्रकारांना पाठबळ देवून आधार व न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

 

यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांनी डिजिटल मीडिया पत्रकार धोरणाबाबत शासन सकारात्मक असून याबाबत धोरण निश्चित करण्याचे काम चालू आहे. करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या भावना लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाकडे मी पोहोचवणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडवणीस यांच्याकडे पाठपुरावा करून आपणास न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close