-->
करमाळा

करमाळा ते हिवरवाडी रस्त्याच्या कामाचा महेश चिवटे यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

 

करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

अनेक वर्षानुवर्षे रखडलेल्या करमाळा ते हिवरवाडी या दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते उद्या शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार असून या कार्यक्रमाला हिवरवाडी, वडगाव, भोसे या पंचक्रोशीतील लोकांनी उपस्थित राहावे. असे आवाहान हिवरवाडी गावचे माजी सरपंच राजेंद्र मेरगळ यांनी केले आहे.

 

करमाळा ते हिवरवाडी या रस्त्याला एक ते दोन फुटापर्यंत खड्डे पडल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या तीन गावातून किमान ३०० ते ४०० विद्यार्थी शिक्षणासाठी करमाळा शहरात येतात. अनेक शेतकऱ्यांना व करमाळा शहरात काम करणाऱ्या कामगारांना या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. परंतु वर्षानुवर्षे या रस्त्याचे काम राजकीय इच्छापाई होत न्हवते.

 

लोकसभा निवडणुकीत येथील विद्यार्थिनींनी सर्व पक्षांच्या प्रचार सभेला व प्रचार बैठकांना विरोध करत हा रस्ता केला तरच राजकीय नेत्यांनी गावात यावे अशी भूमिका घेतली होती. यानंतर महेश चिवटे यांनी स्वतःच्या जिल्हा नियोजन मंडळ फंडातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याला ५० लाख रुपये मंजूर करून घेतले. नंतर लोकसभेच्या आचारसंहितेमुळे हे काम अडकले होते. मात्र आता या कामाचा शुभारंभ होत असून हा रस्ता मंजूर करून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी हिवरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य जयराज चिवटे, आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रमेश कांबळे, माजी सरपंच बाळू पवार, शिवसेना शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, बापूराव गायकवाड, भोजराज सुरवसे, लखन काळे, रघुनाथ काळे, भालचंद्र इवरे यांनी प्रयत्न केले.

पंधरा वर्षानंतर हा रस्ता होत असून रस्ता मंजूर करतो म्हणून अनेक लोकप्रतिनिधींनी आमची फसवणूक केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता मिळाला. हिवरवाडी, वडगाव, भोसे ग्रामस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारी आहेत.

रघुनाथ काळे, वडगाव ग्रामस्थ.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close