
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील श्री. छत्रपती संभाजी विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना जेऊर येथील काॅम्पुटर इन्स्टिट्यूट चे संचालक श्री. प्रदिप पवार सर यांच्याकडून परिक्षेसाठीच्या पॅड चे मोफत वाटप करण्यात आले आहे.
यावेळी त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या विज्ञान युगात MS-CIT ही परिक्षा पास होणे किती गरजेचे आहे. शिपाई या पदापासून ते उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी ही परिक्षा पास असेल तरच नोकरी मिळते. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेला तणावमुक्त सामोरे गेले पाहिजे. असेही ते मार्गदर्शन करताना म्हणाले.
यावेळी मुख्यध्यापक श्री. एस.जे. व्यवहारे, न्यायसहायक, वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे कर्मचारी शशिकांत वाघमारे, ग्रंथपाल अधिकारी प्रदिप गाडे व शिक्षक उपस्थित होते.




