-->
करमाळासामाजिक

श्री उत्तरेश्वर जूनियर कॉलेजच्या वतीने उत्तरेश्वर मंदिर परिसर स्वच्छता अभियान संपन्न

 

केम प्रतिनीधी/संजय जाधव

श्री उत्तरेश्वर जुनियर कॉलेज केम (ता. करमाळा) यांच्या वतीने आज श्री. उत्तरेश्वर मंदिर, बारव, बगीचा परिसर, बाजारतळ, यात्रा परिसराचे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दादासाहेब गोडसे, शालेय समिती अध्यक्ष श्री. दयानंद तळेकर हे होते. तर अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री विष्णू कदम हे होते.

यावेळी श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी संपूर्ण मंदिर परिसराची स्वच्छता केली. प्रत्येक वर्षी महाशिवरात्र यात्रेच्या निमित्ताने या कॉलेजच्या वतीने हे स्वच्छता अभियान राबविले जाते. यावेळी उत्तरेश्वर देवस्थान समितीच्या वतीने कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य परीक्षा पॅड वाटप करण्यात आले.

या मोहिमेमध्ये श्री. मोहन दोंड, श्री भैय्या बीचीतकर, श्री. बाळासाहेब ननवरे, श्री बाळासाहेब देवकर, प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा. संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. सतीश बनसोडे, प्रा. अमोल तळेकर, प्रा. मालोजी पवार, प्रा. सोहन कांबळे, श्री. सरफराज मोमीन, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्वच्छता अभियान उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close