-->
करमाळामाहिती विषयकसामाजिक

प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयात रक्तदान शिबिर व रस्ता सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाचे मार्गदर्शक संचालक मा.डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये गुरुवार दि. ०३ मार्च २०२२ रोजी रक्तदान शिबीर व रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे मा. गणेश करे पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री. सूर्यकांत कोकणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

 

 

या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक श्री. सूर्यकांत कोकणे साहेब यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त रस्त्यावर अपघात कसे घडू शकतात व त्यासाठी कोणकोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, यावरती मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी अपघातातून घडणाऱ्या मृत्यूंची संख्या ही जास्त असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून स्वरक्षण करावे, असे सांगितले.

 

 

तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गणेश करे पाटील साहेब आपल्या भाषणातून म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सध्याची कोरोणाची परिस्थिती पाहता रक्तदान करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हे महाविद्यालय करमाळा तालुक्यातील एकमेव अनुदानित विज्ञान महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांनी या शिक्षणाचा पुरेपूर फायदा घ्यावा, असेही यावेळी त्यांनी सूचित केले. तसेच त्यांनी यापुढे महाविद्यालयात प्रत्येक वर्षी बी.एस्सी.भाग.०३ मधील प्रथम पाच विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके देण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. वाघमारे एम.एस. व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा मा. पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वाती पाटील, प्रास्ताविक डॉ.पी.व्ही. देशमुख व आभार प्रदर्शन प्रा.डी.जी. भोसले यांनी केले. या रक्तदान शिबिरात अक्षय ब्लड बँक, सोलापूर यांनी रक्तसंकलन केले. तसेच या शिबिरामध्ये एकूण ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी श्री शिवशंभु चॅरीटेबल ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजी व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close