उत्तरेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे एस.एस.सी परीक्षेत उत्तुंग यश; सेमी इंग्रजी माध्यमाचा १००% निकाल

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, केम येथील श्री उत्तरेश्वर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी एस.एस.सी परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे. सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल १००% निकाल लागला आहे. तर शाळेचा एकूण निकाल ९७.८१% लागला आहे.
सन २०२३-२४ च्या एस एस सी परीक्षेसाठी या प्रशालेतील १३७ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. त्यापैकी विशेष प्राविण्यासह ४८ विद्यार्थी, प्रथम श्रेणीसह ६० विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीसह २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक कु. गायत्री कृष्णा देवकर ९४.२०%, द्वितीय क्रमांक कु. अपूर्वा अरुण तळेकर ९२%, तृतीय क्रमांक कु. साम्राज्ञी नितीन तळेकर ८८.४०% गुण मिळवून या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
या प्रशालेतील एस.एस.सी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रशालेचे मुख्याध्यापक कदम एस.बी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. वसंत तळेकर, उपाध्यक्ष सौ. पल्लवी रणशृंगारे, श्री. गणेश तळेकर, शालेय व्यवस्थापन समिती मधील सर्व सदस्य तसेच केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



