अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत; युवा सेनेची मागणी

माय मराठी न्यूज नेटवर्क


शिवसेना, युवासेना सचिव वरून सरदेसाई, युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे, युवासेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांचे आदेशाने युवासेना तालुका प्रमुख सुभाष काकडे यांनी माळशिरसचे तहसीलदार सुरेशजी शेजूल साहेब यांना अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत. अशा विषयीचे निवेदन दिले आहे.
माळशिरस तालुक्यात सलग तीन ते चार दिवस झाले वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. वाऱ्यामुळे माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील संगम, बाभुळगांव, लवंग, वाघोली, वाफेगांव, गणेशगांव अशा अनेक भागामध्ये केळी, आंबा, पेरू आदी फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. बाभुळगांव येथील काही घरांचे पत्रे उडाले आहेत. माळशिरस तालुक्यातील पूर्व आणी पश्चिम भागातील तलाठी पिकांचे पंचनामे करण्यास मनाई करत आहेत. त्यामुळे आपण माळशिरस तालुक्यातील तलाठी यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना द्याव्यात. अन्यथा युवासेनेच्या वतीने तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी युवा सेना विधानसभा तालुका प्रमुख मयूर सरगर, युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके, तुषार राऊत, महेश लोखंडे, अजय नाईकनवरे, अर्जुन लोखंडे आदी युवा सैनिक उपस्थित होते.



