खासदार निंबाळकर यांनी घेतली उजनी दुर्घटनेतील कुटुंबीय व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सोमवार दि. २७ मे रोजी करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कुगाव येथे उजनी जलाशयात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या डोंगरे व अवघडे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली. तसेच शासन दरबारी प्रयत्न करून दुर्घटनाग्रस्त जाधव, अवघडे व डोंगरे कुटूंबीयांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी कुटुंबीयांना दिली.

तसेच करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत लवकरात लवकर नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या फळबागा व ईतर शेतीपिकांचे पंचनामे करावे अशा सूचना दिल्या.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, उपाध्यक्ष अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, चिखलठाण चे माजी सरपंच चंद्रकांत सरडे, वाशिंबे चे सरपंच तानाजी बापू झोळ, उपसरपंच दादासाहेब सरडे, गणेश काळे, सचिन गायकवाड, दीपक गायकवाड यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



