-->
करमाळाक्रीडा

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त केत्तूर येथे भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान संपन्न 

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जयंती निमित्त केत्तुर (ता. करमाळा) येथे भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले होते. करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कुस्तीचे मैदान पार पडले.

 

शेवटची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी मुन्ना झुंजुर्के विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन संतोष जगताप यांच्या मध्ये झाली असून यामध्ये मुन्ना झुंझुरके या मल्लाने विजय मिळवला. प्रथम बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम २ लाख ५१ हजार व चांदीची गदा अशा प्रकारचे होते. तसेच ईतर कुस्त्या भरत लोकरे विरुध्द सुहास गोडगे, कालीचरण सोलकर विरुध्द प्रशांत जगताप, धनाजी कोळी विरुध्द भैरू माने यांच्यासह अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्या या वेळी पार पडल्या.

 

अनावश्यक खर्चाला फाटा देऊन मल्लांसाठी कुस्तीचे मैदान घेतल्यामुळे संयोजकाचे सर्व स्तरातुन कौतुक होते आहे. या कुस्ती स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी पै. सागर पवार, पै. शंभू खैरे, पै. राजसिंह खाटमोडे, पै. दादा पवार, करण निकम, उदयसिंह खाटमोडे- पाटील आदींनी अविरत मेहनत घेतली.

 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त हे आमचं कुस्ती स्पर्धेच दुसरे वर्ष होते. पुढील वर्षी यापेक्षा मोठ्या व नामवंत मल्लांच्या कुस्त्या घेऊन कुस्ती या मैदानी खेळाला उत्तेजना देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

उदयसिंह खाटमोडे-पाटील, संयोजक

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close