-->
करमाळा

प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडाली; ६ जण बुडाल्याची माहिती, उजनी धरणातील घटना

 

माय मराठी न्यूज नेटवर्क 

 

उजनी धरण पात्रात मंगळवार दि.२१ मे रोजी सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यात करमाळा तालुक्यातील कुगावहून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे प्रवासी घेऊन जाणारी बोट (लांस) बुडाली असून यामध्ये सहा जण बुडाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. यातून एका जणाने नदी काठापर्यंत पोहत जावून आपला जीव वाचवला आहे.

 

कळाशी गावच्या हद्दीत उजनी पात्रात ही दुर्दैवी घटना घडली आहे. कळाशीहुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीच्या बाबतीत अपघात झाल्याची माहिती पुढे आली असून या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीमध्ये एकूण तीन पुरुष, एक महिला, दोन लहान मुले असे प्रवासी आणि एक बोट चालक एकुण सात जण प्रवास करत होते. यातील राहुल डोंगरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) हे पोहत कळाशी (ता. इंदापूर) या ठिकाणी आले आहेत.

 

सायंकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळी वारे व पावसाने हजेरी लावल्याने या वादळी वाऱ्याच्या वेगाने आणि पाण्याच्या लाटांनी ही बोट पलटी झाली असल्याचा अंदाज आहे. सदर घटना समजतात बचाव कार्यासाठी इंदापूर येथील महसूल, पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ पोहचले असून ते बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close