-->
कृषी विषयकराजकिय

युवा सेनेच्या मागणीला यश, दुष्काळ निधीच्या याद्या प्रसिद्ध- गणेश इंगळे

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

युवासेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी १५ मे २०२४ रोजी माळशिरस चे तहसीलदार मा. सुरेश शेजूल साहेब यांना प्रत्यक्षात भेटून शेतकऱ्यांच्या दुष्काळ निधीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खातेवर जमा करण्या विषयी विनंती करून निवेदनद्वारे आंदोलन करण्याचा ईशाराही देण्यात आला होता.

 

दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खातेवर तात्काळ जमा न केल्यास शेतकरी घेऊन रस्त्यावर उतरू असा ईशारा दिला असता माळशिरस चे तहसीलदार सुरेश शेजूल साहेब यांनी तात्काळ दुष्काळ निधीच्या शेतकऱ्यांच्या याद्या १७ मे २०२४ रोजी प्रसिद्ध केल्या. त्यामुळे शेतकरी वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच माळशिरस चे तहसीलदार साहेब यांचे आभार मानले.

 

माळशिरस तालुक्यातील दुष्काळ निधीच्या ज्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यातील ज्या शेतकऱ्यांच्या केवायशी पेंडिंग आहेत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या महा ई सेवा केंद्राशी संपर्क साधून केवायशी पूर्ण करून घेऊन दुष्काळ निधीस पात्र होयच आहे.

श्री. गणेश इंगळे, युवासेना जिल्हा प्रमुख (सोलापूर)

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close