माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)


करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार, संपादक संघटनेच्या वतीने ‘जेष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते २ या वेळेत तपश्री प्रतिष्ठान संचलित दिव्यरत्न गुरु गणेश गोपालन संस्था, नगर रोड करमाळा याठिकाणी करण्यात आले आहे. महाराष्ट्रात प्रथमच डिजिटल मिडियाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नावाने ‘आदर्श कार्य गौरव पुरस्कार’ करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संघाने सुरू केला असून पत्रकारिता क्षेत्रातील गुरुवर्य राजा माने यांच्या प्रति असलेला प्रेमाचा हा अनमोल ठेवा असणार आहे.

करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाची अविरत सेवा करणाऱ्या पत्रकार बांधवांचा ही करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार, संपादक संघटना करमाळा यांच्या वतीने जेष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्काराने सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, मुख्याधिकारी सचिन तपसे तसेच डिजिटल मिडियाचे राज्य उपाध्यक्ष सतिश सावंत, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रविण नागणे, राज्य संघटक संघटक मुरलीधर चव्हाण, प्रदेश सदस्य संतोष सुर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे, बार्शी तालुकाध्यक्ष धीरज शेळके, दिनेश मेटकरी, कुंदन हुलावळे आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात श्रेणिकशेठ खाटेर यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार, प्रा. रामदास झोळ सर यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल, तर महेश निकत यांना युवा आयकॉन, तसेच ॲड. अजित विघ्ने यांना तालुका आयकॉन आणि युवानेते म्हणून व भीष्माचार्य चांदणे यांना आदर्श शिक्षक म्हणून ‘ज्येष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्कार २०२४’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन ‘आदर्श पत्रकार’ म्हणून गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी डिजिटल मिडीयाचे करमाळा तालुकाध्यक्ष दिनेश मडके, उपाध्यक्ष शितलकुमार मोटे, गौरव मोरे, सचिव नरेंद्रसिंह ठाकूर, सहसचिव प्रज्योत गांधी, खजिनदार सचिन हिरडे, संघटक राजाराम माने, ज्ञानदेव काकडे, संपर्कप्रमुख अशोक मुरुमकर, व्यवस्थापक सुर्यकांत होनप, प्रसिद्धीप्रमुख अंगद भांडवलकर, राहुल रामदासी, नितीन झिंजाडे, सिद्धार्थ वाघमारे, हर्षवर्धन गाडे, सागर गायकवाड, युवराज जगताप, धनंजय पाटील, आदीजण परिश्रम घेत असुन या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



