
माय मराठी न्यूज


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे ,तालुका संघटक प्रवीण कटारीया, उपतालुकाप्रमुख श्रिहरी तळेकर, शहरप्रमुख संजय शिंदे महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण यांच्या उपस्थितीत आज जय महाराष्ट्र मित्र मंडळ येथे मेळावा नियोजन करण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत २२ एप्रिल रोजी भव्य मेळावा घेण्याचे निश्चित झाले आहे.
करमाळा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी ताकद असून आजपर्यंत अधिकृत चिन्हावर तिन वेळा खासदार दोन वेळा आमदार तर एक वेळ शिवसेना पुरस्कृत आमदार शिवसैनीकांनी निवडणूक दिला आहे.भाजप सोबत युती असताना देखील मित्र पक्षाचे काम प्रमाणीक पणे काम केले मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांना व शिवसैनीकांना सत्तेत किंवा विकास निधीत मात्र सावत्र पणाची वागणूक भेटत आहे.वरिष्ठांकडून देखील या बाबतीत निवडणूक झाल्यानंतर म्हणावे तसे लक्ष दिले जात नसल्याने शिवसेनेला स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील खाते उघडता आले नाही अशी खंत आज शिवसैनिकांनी बोलून दाखवली. त्यामुळे शिवसैनिकांत नाराजी असून मोठी ताकद असताना मरगळ आल्याचे चित्र आहे .त्यामुळेच वरिष्ठांकडून व उमेदवारांकडून भविष्यातील शब्द घेऊनच महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय व्हायचे असा निर्धार शिवसैनिकांकीनी केला आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे ,तालुका संघटक प्रवीण कटारिया महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण यांनी अक्रमक पणे भाषण करून यापुढे शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी एकत्रित पणे काम करण्याचे आश्वासन शिवसैनिकांना केले.
या बैठकीस शिवसेना उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, पंकज परदेशी, संजय भालेराव, केम शिवसेना शहरप्रमुख सतीश खानट, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, जिल्हा सचिव आदेश बागल, उपतालुकाप्रमुख पांडुरंग ढाणे,माऊली फरतडे, शहरप्रमुख समीर हलवाई, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे,भाऊ मस्तुद,भिम क्रांती दलाचे शहाजीराव धेंडे,कृष्णा बोराडे शिवसेना विभाग प्रमुख अविनाश गाडे, युवासेना विभाग प्रमुख मयुर तावरे,शाखा प्रमुख ओकांर कोठारे, उप शाखाप्रमुख विशाल नवगण,शंकर बदे, मधूआबा काळे ,भागडे सरपंच, नवनाथ रगडे ,सुनिल तळेकर शाखा प्रमुख बालाजी वाडेकर, यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.या मेळाव्याकडे आता तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे .



