-->
करमाळाराजकिय

करमाळ्यात भाजप विरोधी नेत्यांची वज्रमुठ; इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचा निर्धार

येत्या दोन दिवसांत इंडिया आघाडीच्या माध्यमातून भव्य मेळावा घेण्याची घोषणा

 

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर) 

 

भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी तसेच देशाचे संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी करमाळा तालुक्यातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन माढा लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. करमाळा येथील हॉटेल राजयोग येथे समविचारी इंडिया आघाडीच्या घटकपक्ष नेत्यांची बैठक संपन्न झाली.

 

या प्रसंगी करमाळा तालुक्यातील प्रा. रामदास झोळ सर, कामगार नेते दशरथ आण्णा कांबळे, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप, सुजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या ॲड. सविता शिंदे, तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते शहराध्यक्ष संजय शिंदे आदी उपस्थित होते.

 

करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून इंडिया आघाडीची भूमिका समजावून सांगणार आहोत. भाजपची हुकुमशाही देशांमध्ये वाढत चालली आहे. सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून शेतकरी मजूर घटकांना वंचित ठेवण्याचे काम भाजपने करून भांडवलशाहीची निर्मिती केली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना फसवणाऱ्या लोकांना आपल्याबरोबर घेऊन आपल्या पक्षाचे हित जपण्याशिवाय सामान्य जनतेकडे बघण्यास हे सरकार तयार नाही. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून सध्या सक्षम पर्याय म्हणून काम करणार आहोत. भारतात बेरोजगारी शिक्षणाचा प्रश्न बिकट झाला आहे. गरीबांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. विरोधी पक्ष ठेवायाचा नाही, घटक पक्षाची तोडमोड करून धमकी देऊन ईडीच्या माध्यमातून लोकशाही संपवण्याचे काम भाजपा करत आहे.

 

यावेळी बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण विषयी सरकारने फक्त दिशाभूल करून समाजाला फसवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी, लोकशाही जिवंत राहण्यासाठी इंडिया आघाडीची गरज असून त्याकरिता जास्तीत जास्त मतदान करून घेणे आवश्यक आहे. करमाळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले न देणारे, त्यांचे नावावर कर्ज काढणारे, सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणणाऱ्या साखर कारखानदारांना, लबाड पुढारी लोकांना बळ देणाऱ्या भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी जनतेने उभा राहणे गरजेचे आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील जनतेला इंडिया आघाडीची भूमिका समजावून सांगण्यासाठी येत्या दोन दिवसात भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close