उंबरे (वे) येथे रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषी मित्रांच्या वतीने माती परीक्षण
माय मराठी न्यूज नेटवर्क


महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्नित व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांचे संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषी दुतांकडून मौजे उंबरे (वे) येथे माती परीक्षण करण्यात आले. या दरम्यान महाविद्यालयातील कृषी मित्र सुरज शिरगिरे व अभिजीत शेलार यांनी शेतकऱ्यांच्या मातीचे परीक्षण केले.
यादरम्यान त्यांनी जमिनीमधील माती मातीचे प्रकार, त्यामध्ये आढळणारी पोषक अन्नद्रव्य, त्यांच्या कमतरतेचे पिकावर होणारे परिणाम, त्यातून उत्पादनात होणारे घसरण, शेती प्रणालीतील बदलामुळे जमिनीची होणारी धूप, त्यासाठी मृदा संवर्धनाचे उपाय, सेंद्रिय कार्बनचे दिवसेंदिवस कमी होणारे प्रमाण, त्यास वाढवण्यासाठी करावयाच्या उपाय पद्धती आणि पीक निहाय खत व्यवस्था राहण्यासाठी माती परीक्षणाचे महत्त्व अशा विविध मुद्द्यावरती मार्गदर्शन करून मृदा परीक्षण केले आणि शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड दिले.
या उपक्रमामध्ये अजित मिसाळ (कृषी केंद्र उंबरे), संजय शिरगिरे, दादासाहेब भोसले, धनाजी शिरगिरे, बापू होनमाने, सुधीर भोसले, पांडुरंग भोसले, अरुण भोसले, राणू शिरगिरे, अल्ताफ मुलांनी, अशा प्रगतशील बागायतदारांनी आपल्या मातीचे परीक्षण केले. यासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. नलावडे सर, मृदा व रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. संतोष आडत, प्रा. तेजश्री आडत यांचे सहकार्य लाभले.




