-->
करमाळाराजकिय

गणेश चिवटे यांच्या हस्ते कोंढेज, सौंदे व झरे येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर केलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटा चालू असून अलीकडेच कोंढेज नंतर त्यांनी आज दोन रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन केले आहे. तसेच सौंदे येथे बाळनाथ मंदिर परिसरात भव्य सभामंडपाचे लोकार्पण झाले. आज झरे येथे चौधरी वस्ती व बागल वस्ती येथे रस्त्यासाठी त्यांनी १५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या दोन्ही कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात सात ते आठ कोटी रुपयांच्या विकास कामासाठी गणेश चिवटे यांनी निधी खेचून आणला आहे. या सर्व मंजूर कामाचे उद्घाटन सध्या ते करत आहेत. झरे येथे त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष तथा झरे ग्रामपंचायतचे सदस्य सोमनाथ घाडगे यांनी केले होते.

 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पै. अफसर तात्या जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, दहिगावचे उपसरपंच लक्ष्मण शेंडगे, पोफळजचे उपसरपंच बिभीषण गव्हाणे, पोथरेचे विष्णू रंदवे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धर्मराज नाळे, नितीन कानगुडे, हर्षद गाडे, भैयाराज गोसावी आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close