-->
करमाळाराजकियसामाजिक

भाजपची करमाळा विधानसभा निवडणूक समितीची बैठक संपन्न

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

244, करमाळा विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी निवडणूक समितीची बैठक भाजपा संपर्क कार्यालय गायकवाड चौक करमाळा येथे विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे व विधानसभेच्या दृष्टिकोनातून बुथ शक्तीकरण व प्रत्येक प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या यांचा आढावा घेण्यात आला. सर्वांनी विधानसभेचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन कामास सुरुवात करावी. असे आवाहन पदाधिकारी यांना यावेळी करण्यात आले.

 

या प्रसंगी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही पूर्ण ताकदीनिशी लोकसभा व विधानसभा निवडणुक लढणार असून आपण लोकसभे बरोबर विधानसभेची ही तयारी करणार आहोत व त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एक दिलाने व एक मुखाने काम करावे. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोचून त्याचा लाभ जनतेस मिळवून द्यावा आणि गरजू लोकांशी संपर्क करावा व त्यांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी यांनी सर्वांना आपापल्या जबाबदाऱ्या सांगितल्या तसेच संजय अण्णा घोरपडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

 

या बैठकीसाठी तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, निवडणूक समिती प्रभारी काकासाहेब सरडे, सहप्रभारी डॉ. अभिजीत मुरूमकर, संयोजक सोमनाथ घाडगे, आजिनाथ सुरवसे, जितेश कटारिया, अमोल पवार, विनोद महानवर, लक्ष्मण शेंडगे, बिभीषण गव्हाणे, जयंत काळे पाटील, प्रकाश ननवरे, विष्णू रणदिवे, सचिन चव्हाण, प्रियाल अग्रवाल, नितीन निकम, प्रवीण शेळके, किरण शिंदे, भैय्या गोसावी, तुकाराम भोसले, महिला आघाडीच्या राजश्री खाडे, संगीता नष्टे, रेणुका राऊत, मस्तान कुरेशी, पवन कोठारी, प्रवीण बिनवडे, संजय किरवे, संतोष जवकर, विशाल घाडगे, कमलेश दळवी, सागर सरडे, हर्षद गाडे, सचिन चव्हाण, दादा गाडे, किरण शिंदे, प्रवीण शेळके, मस्तान कुरेशी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व चुनाव समितीचे सदस्य उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close