जेऊर येथील ‘या’ सुवर्णकन्येचा सोलापूर येथे महिला दिनानिमित्त सन्मान

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)


सोलापूर येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना सोलापूर जिल्हा सोलापूर सलग्न वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त व अनंत अडचणींवर मात करून आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी जगणाऱ्या, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
समाजातील कर्तुत्वान, कार्यक्षम, कर्तबगार व महत्वकांक्षी स्त्रिया यासाठी एक धाडसी कर्तुत्वान कार्यक्षम असणारी नारीशक्ती, एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन जेऊर (ता. करमाळा) येथील सोनार समाजातील सुवर्णकन्या कु. अंकिता विष्णू वेदपाठक यांना सोलापूर येथील सौ शिल्पा ओसवाल मॅडम तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व डॉ. सारिका देगावकर सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ सोलापूर यांच्या हस्ते सन्मानपत्र व विशेष स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.



