-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

पोंधवडी चारी अस्तरीकरण कामाचा शुभारंभ; आ. संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

गेली २५ वर्षें प्रतिक्षेत असलेल्या कुकडी डावा कालवा अंतर्गत पोंधवडी शाखा कालवा- हुलगेवाडी चारीचे कामाचा शुभारंभ ६ जानेवारी २०२२ रोजी करमाळा तालुक्याचे विकास प्रिय आमदार संजयमामा शिंदे यांचे शुभहस्ते व मा.आ. जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता. या कामासाठी ९ कोटी २३ लक्ष निधी मंजूर झाला होता. संजयमामा यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे बोगद्याचे काम वेळेपूर्वीच पूर्ण होऊन कुस्करवाडी चारीतून चाचणीचे पाणी ३ ऑगस्ट २०२३ रोजी सोडले होते. त्यावेळी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी पाणी पूजन करून आनंदोत्सव साजरा केला होता. परंतु या चाऱ्यामधून गळती होत होती. त्यास अस्तरीकरण लवकर होणे बाबत परिसरातील नागरिकांनी संजयमामा यांचेकडे मागणी केली होती.

 

आमदार संजयमामा शिंदे यांनी याही कामाचा पाठपुरावा करून अस्तरीकरण काम मंजूर करून घेतले आहे. या कामाचा शुभारंभ कोर्टी ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज सोमवार दिनांक १९/२/२०२४ रोजी संपन्न झाला. संजयमामा यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वांगीण विकास कामात गती प्राप्त होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

यावेळी निलकंठ अभंग सेवा निवृत्त कृषी अधिकारी, संजय जाधव सर मा. उपसभापती, श्रीरंग मेहेर अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग, नानासाहेब झाकणे उपसरपंच कोर्टी, पै. आप्पा शेरे, हनुमंत जाधव, आशिष गायकवाड संचालक मकाई कारखाना, विकास गावडे, दादा गावडे, शशिकांत गावडे, रुपचंद गावडे मा. उपसरपंच, भैय्या इनामदार, मनोहर शेरे, मोहन गावडे, नागेश जाधव, राजाभाऊ शितोळे, मुन्ना शेख इ. मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close