
माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


हिवरे नागोबाचे (ता. करमाळा) येथील पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या जिल्हापरिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी देवीदास सारंगकर, गटशिक्षण अधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सुग्रीव निळ, जयंत नलवडे, केंद्र प्रमुख दामाजी श्रिरामे हे उपस्थित राहणार आहेत.
स्नेहसंमेलना मध्ये, चारोळ्या, नृत्यकला, एकांकिका पथनाट्य, समृह नृत्य याचा समावेश असल्याने विद्यार्थांचे कलागुण, नेतृत्व गुण, आत्मविश्वास वाढतो व याचा पुढील आयुष्यात फायदा होतो. त्यामुळे या उपक्रमाचे आयोजन केले असुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पाठिंबा देण्यासाठी पालकासंह सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरींकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन मुख्याध्यापक निळकंठ हनपुडे यांनी केले आहे.



