-->
करमाळाविशेष

करमाळ्याचे पत्रकार शितलकुमार मोटे जोशाबा पुरस्काराने (दर्पणकार पुरस्कार) सन्मानित

 

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)

 

जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व बहुजन समाज परिषदेच्या वतीने आदर्श पत्रकाराला देण्यात येणारा सन २०२४ चा जोशाबा पुरस्कार (दर्पणकार पुरस्कार) करमाळ्याचे पत्रकार शितलकुमार मोटे यांना शिवसेना नेते अरविंद पवार, दिलीप देवकुळे, बालाजी लोंढें (मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद) यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

 

पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल मोटे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. प्रा. राजेंद्र दास हे होते. हा कार्यक्रम कुर्डूवाडी येथील कै. विठ्ठलराव शिंदे सभागृह पंचायत समिती येथे पार पडला.

 

या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते अरविंद पवार, माळशिरस सरपंच माऊली कांबळे (तृतीयपंथी सरपंच), दिलीप देवकुळे (डी.एस.एस प्रदेशाध्यक्ष), बालाजी लोंढें (मुख्याधिकारी करमाळा नगरपालिका) संतोष लोंढें (सरपंच ग्रामपंचायत चिंचोली), माऊली पाटोळे हे उपस्थित होते. बाळासाहेब देवकुळे (संस्थापक अध्यक्ष जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था चिंचोली महाराष्ट्र) यांनी प्रास्ताविक केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश आतकर यांनी तसेच आभार बाळासाहेब देवकुळे यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close