-->
राजकिय

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार’ कडून माढा मतदारसंघासाठी इच्छुक- तुकाराम साळुंखे पाटील

 

अकलूज/प्रतिनिधी

 

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार’ कडून माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून या मतदारसंघाच्या उमेदवारीची मागणी आपण राज्याचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली असल्याचे जय हिंद महाराष्ट्र राज्य कल्याणकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील यांनी सांगितले.

 

तुकाराम साळुंखे पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम खाते येथे मस्टर कारकून म्हणून १७ वर्षे काम केले आहे. नंतर महसूल विभागात माळशिरस व माढा तालुक्यात तलाठी या पदावर काम केले असून ते माढा येथे तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष होते. तसेच माळशिरस येथे ही त्यांनी तलाठी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव असून जनसंपर्क हा मोठा आहे. माळशिरस, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, फलटण, माण, खटाव, विटा, आटपाडी या तालुक्यात त्यांचे नातलग, मित्रपरिवार, अधिकारी, कर्मचारी, मजूर, शेतकरी व कष्टकरी यांचा लोकसंपर्क आहे. त्यांच्याकडे जनसंपर्क, संघटन कौशल्य असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य संघटक सचिव असल्याने त्यांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे.

 

या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर, फुले यांचे विचार घेऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा धरून पुरोगामी महाराष्ट्राचे नेते मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांना सर्व तरुण पिढीने साथ देण्याचे ठरवले आहे. “जोडा धागा आणि कामाला लागा” या विचाराने शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षात गटात चैतन्य निर्माण झाले आहे. “तुम्ही घड्याळ चोरी करू शकता..पण वेळ नाही..” अशी भावना देखील श्री. साळुंखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close