
केम/प्रतिनिधी


केम (ता. करमाळा) येथील येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवव्याख्याते मा.श्री. गणेश हनुमंत भोसले यांचे ‘तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर सर यांनी केले. तसेच पुष्पहार अर्पण शिवव्याख्याते गणेश भोसले यांनी केले.
‘तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विषयावर शिवव्याख्याते गणेश भोसले यांनी ओजस्वी शैलीतून उपस्थितांचे मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी टाळ्यांची भरभरून दाद दिली. या प्रेरणादायी व्याख्यानाला उपस्थित असलेले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंत तळेकर, उपाध्यक्ष गणेश तळेकर, ए.पी ग्रुपचे संस्थापक अच्युत काका पाटील, महावीर आबा तळेकर, ग्रामपंचायत सदस्य विजय तळेकर, सागरराजे तळेकर, बापूनेने तळेकर, दत्ताभाऊ तळेकर, विष्णू अवघडे, ज्येष्ठ पत्रकार राहुल रामदासी, योगेश्वर भिस्ते यांचा स्वागत सत्कार प्रशालेचे पर्यवेक्षक बी. व्ही सांगवे सर यांनी केला. तर माता पालक संघ अध्यक्ष कल्पना तळेकर, सोनाली तळेकर, राणी तळेकर, सविता गावडे, भाग्यश्री भिस्ते, राधिका पलसे, आश्विनी टकले यांचे स्वागत व सत्कार प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका नरखेडकर मॅडम, पी. के राऊत, पी.ए गाडे मॅडम, कुंभार मॅडम यांनी केले. तसेच शिवव्याख्याते मा. गणेश हनुमंत भोसले यांचा सत्कार प्रशालेचे पर्यवेक्षक बी. व्ही सांगवे सर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन के. एन वाघमारे सर यांनी केले. तर सर्वांचे आभार प्राध्यापक डॉ. मच्छिंद्र नांगरे सर यांनी मानले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.



