-->
करमाळाराजकिय

म्हसेवाडी गावासाठी प्रथमच सुरू झाली बससेवा; ग्रामस्थांनी आ. शिंदे यांच्याकडे केली होती मागणी

 

प्रतिनिधी/करमाळा

 

करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी जानेवारी २०२३ मध्ये करमाळा मतदारसंघाचा गाव भेट दौरा केला होता. या गावभेट दौऱ्यात गावकऱ्यांकडून आलेल्या विविध मागण्या, समस्या यावरती तोडगा काढून उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी त्या त्या विभागाच्या बैठका घेऊन त्यासंदर्भात सूचना केलेल्या होत्या. त्यानुसारच करमाळा मतदारसंघातील ज्या गावांमध्ये अद्यापही बस सेवा सुरू झालेली नव्हती अशा गावांमध्ये बस सुरू करण्यासंदर्भात आ. संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार करमाळा- पांडे- म्हसेवाडी ही बस सेवा २०२४ च्या नवीन वर्षात दि. ४ जानेवारी पासून सुरू झाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सदर बस चालू करण्यासाठी अंकुश पाटुळे आणि संतोष ननवरे यांनी विशेष पाठपुरावा केला.

 

नवीन बस सेवा सुरू झाल्या निमित्त बसचे चालक नागनाथ चव्हाण आणि वाहक बालाजी तुंदारे यांचा सन्मान ग्रामस्थांनी केला. याप्रसंगी अर्जुननगर- म्हसेवाडी चे उपसरपंच मा. त्रिंबक भाऊ ननवरे, चंद्रकांत पाटुळे, पानाचंद बंडगर, भाऊसाहेब अडसुळ, अंकुश पाटुळे, सुनील लोखंडे, दिपक ननवरे, माधव पाटुळे, विलास ननवरे, अशोक लोखंडे, संतोष ननवरे, हरिश्चंद्र बंडगर,पोपट बिचकुले, नागनाथ ननवरे, अर्जुन खरात, खंडु ननवरे, रमेश ननवरे, दिपक लोखंडे, महादेव पाटुळे, अशोक ननवरे, सुदाम आदलिंग आबा पाटुळे आदी ग्रामस्थांसह विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close