
करमाळा/प्रतिनिधी


वंजारवाडी (ता. करमाळा) येथील वंजारवाडी गावठाण ते मधला मळा-पिंपळाचा मळा या रस्त्याच्या खडीकरण कामाचा शुभारंभ भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश (भाऊ) चिवटे यांच्या हस्ते बुधवार दि. ३ जानेवारी रोजी करण्यात आला.
या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जनसुविधा निधी मधून चिवटे यांनी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वंजारवाडी गावठाण ते मधला मळा-पिंपळाचा मळा या भागातील लोकांना रस्त्याची खूप मोठी अडचण होती, ती या रस्त्यामुळे दूर झाली आहे. योग्य वेळी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने चिवटे यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी भाजपाचे ता. उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब राख, विनोद केकान, धनंजय केकान, माजी सरपंच हरिश्चंद्र बिनवडे, रामदास राख, दादासाहेब बिनवडे, माजी उपसरपंच अंबादास बिनवडे, माजी ग्रा. सदस्य बाबासाहेब बिनवडे, सुनील कराड, भुजंग गीते, दत्तात्रय राख, संतोष बिनवडे, ठकसेन बिनवडे, बाळासाहेब केकान, संजय कराड, अमोल बिनवडे, बाळासाहेब बिनवडे, उत्तम बिनवडे,मयूर कराड, भैया आंबेकर, माऊली बिनवडे, निलेश राख, नवनाथ राख, अविनाश राख, सुभाष बिनवडे, ऋषिकेश बिनवडे, सोमनाथ बिनवडे यांच्यासह वंजारवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.



