साल्हेर ( Salher )


महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असण्याचा मान कळसुबाई आहे तर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणजे साल्हेर.
उंची – १५६७ मीटर
साल्हेर किल्ला बागलाण मध्ये येतो.
गडाचा घेरा जवळपास ११ किलोमीटर चा तर क्षेत्र ६०० हेक्टर आहे.
डांग – गुजरात आणि बागलाण यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर असल्यामुळे साल्हेर ला संरक्षण दृष्ट्या विशेष महत्व होते.
१६७१ मध्ये साल्हेर स्वराज्यात दाखल झाला.
मोगलांचे इखलासखान व बहलोलखान या दोन सरदारांचा मराठ्यांच्या फौजेने खुल्या मैदानावर पराभव याच गडाच्या भागात केला होता.
या युद्धात मराठ्यांचे जवळपास १ लाख २० हजार चे सैन्य होते.
बघण्याची ठिकाणे :-
वाघांबे मार्गे गडावर आल्यास उजवीकडे आणि साल्हेरवाडीहून गडावर आल्यास डावीकडे वळल्यास पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर काही भग्न मंदिरांचे अवशेष आढळतात. पुढे थोडयाच अंतरावर पाण्याची दोन टाकी असून समोर गंगासागर तलाव दृष्टीस पडतो. तलावाच्या बाजूलाच रेणुका मातेचे आणि गणेशाचे छप्पर नसलेले मंदिर आहे. या मंदिराच्या जवळून दोन वाटा फुटतात. उजवीकडे जाणारी वाट सरळ एका पाण्याच्या टाक्यापाशी घेऊन जाते. टाक्यासमोरच एक यज्ञवेदी आहे. जवळच एक मूर्तीदेखील आहे. मंदिरापासून वर चढत जाणारी वाट आपल्याला तीन गुहांपाशी घेऊन जाते. गुहांच्या समोर मारूतीचे मंदिर आहे. या गुहांमध्ये रहाता येऊ शकते. गुहांशेजारची वर जाणारी वाट गडाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाते. या शिखरावर श्री परशुरामाचे मंदिर आहे. या उंच गडमाथ्यावर काहीशा ढासळलेल्या अवस्थेत असलेल्या या मंदिरात परशुरामांची मूर्ती व पादुका आहेत, आणि जोडीला भान हरपून टाकणारा निसर्ग आहे. येथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य नजरेस पडते. येथून संपूर्ण बागलाण विभाग दिसतो. हा गड डांग – गुजरात आणि बागलाण यांना जोडणार्या व्यापारी मार्गावर असल्याने संरक्षण दृष्ट्या महत्वाचा होता. समोर दक्षिण बाजूला अजंठा – सातमाळा डोंगरातले धोडप, इखारीया हे सुळके दिसतात. पूर्वेकडे मांगीतुंगी, तांबोळया, न्हावीगड, हनुमान टेकडी, मुल्हेरगड, हरगड, मोरागड आणि सालोटा नजरेस पडतात. समोरच हरणबारीचे धरण लक्ष वेधून घेते
राहण्याची सोय :
गडावर असलेल्या तीन गुहांमध्ये राहण्याची सोय व्यवस्थित होऊ शकते.
जेवणाची सोय :जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :गंगासागर तलाव व त्याच्या बाजूस असणारी दोन पाण्याची टाकी यातील पाणी पिण्यास योग्य आहे.



