
माय मराठी न्यूज नेटवर्क


व्यसनमुक्ती केंद्र ‘मोक्ष फाउंडेशन’ मध्ये उपचार घेत असलेल्या सदस्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे. यासाठी भारतीय रत्न पुरस्कार विजेते अमोल भागवत व सुवर्ण भरारी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सारिकाताई नागरे यांना निमंत्रित करण्यात आले होते.
सध्याच्या सामाजिक परिस्थितीत फक्त महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर मागील वर्षात जवळपास ताण-तणाव व व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे जवळपास १ लाख ६५ हजार व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. हे भीषण वास्तव बदलण्यासाठी व्यसनी व नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी व्यसनमुक्ती उपक्रम राबवले गेले तर हा एक महत्त्वाचे सामाजिक योगदान म्हणून भविष्यामध्ये गणले जाईल अशी आम्हाला अशा वाटते. असे वक्तव्य व्यसनमुक्ती केंद्रात उपस्थित असलेल्या सर्व सामाजिक क्षेत्रातील व व्यसनमुक्ती केंद्रातील पदाधिकाऱ्यांनी एकमताने केले.
यादरम्यान व्यसनांपासून अलिप्त होण्यासाठी उपचार घेत असलेल्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनामध्ये दैनंदिन आयुष्यात नित्य पद्धतीने व सुरळीत कार्य करून आपल्या कुटुंबियांचे भविष्य उज्वल करावयाचे असेल तर सर्वप्रथम व्यसनांपासून दूर व्हावे. टप्प्याटप्प्याने एकेक अडचणींवर मात केली तर एक दिवस नक्कीच येथे उपस्थित असलेला प्रत्येक सदस्य हा त्यांच्या क्षेत्रामध्ये एक नवीन उंची स्थापित करेल असे मी आपणास खात्रीपूर्वक सांगतो. व्यसनांपासून स्वतःला दूर करून आपले, आपल्या कुटुंबाचे व परिवाराचे चांगल्या कार्याने नाव उज्वल करावे. असे प्रतिपादन कामगार नेते अमोल भागवत यांनी केले. यानंतर सुवर्ण भरारी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका सारिका नागरे यांनी सांगितले की, आपण सर्व सदस्यांनी यापुढे आपल्या एका नियोजित व उत्तम पद्धतीच्या भावी आयुष्याला या ठिकाणच्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन सुरुवात करावी. या पुढे आपणास कोणतीही समस्या किंवा काही अडचण आल्यास आम्ही सर्व सदस्य आपल्या मदतीसाठी तयार आहोत. यासाठी केंद्राच्या संचालकांनी माझा मोबाईल नंबर त्यांना द्यावा जेणेकरून एका चुकलेल्या व्यक्तीला दिशा देण्यासाठी आम्हाला काही प्रयत्न करता येतील.
यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या नाशिक जिल्हा महिला उपाध्यक्षा सविता खैरनार, संजय बलकवडे, दिलीप गायकवाड, संजय शिंदे, शामआप्पा डावरे, राकेश तेलोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. संजय बलकवडे यांनी व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व पदाधिकारी व संचालक व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमामध्ये व्यसनी रुग्णांना मार्गदर्शन करण्याची संधी मोक्ष फाउंडेशनचे संचालक सॅवियो डिक्रुझ, संतोष सरवनकर व जोशी यांनी उपलब्ध करून दिल्याने उपस्थित सर्व सदस्यांना व रुग्णांना योग्य मार्गदर्शन लाभले.




