-->
करमाळा

श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये ‘राष्ट्रीय गणित दिन’ उत्साहात साजरा

 

केम/प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्यातील केम येथील श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय गणित दिन’ आणि गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक कदम एस. बी सर यांनी केले. तर प्रतिमेस पुष्प अर्पण प्रशालेचे पर्यवेक्षक सांगवे बी. व्ही सर, गिते सर, हिरवे सर, पवार सर, पोतदार सर यांनी केले.

 

यावेळी गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याची माहिती आणि दैनंदिन जीवनात गणित विषयाचे महत्त्व प्रशालेचे सहशिक्षक जी. के जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. प्रशालेतील गणित विभागाचे प्रमुख गिते सर यांनी राष्ट्रीय गणित दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी गणित विषयाचा जास्तीत जास्त सराव करावा असे मत मांडले.

 

राष्ट्रीय गणित दिनाचे सूत्रसंचालन वाघमारे के. एन सर यांनी केले. तर उपस्थित सर्वांचे आभार पवार टि. व्ही सर यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close