माय मराठी न्यूज नेटवर्क


मायबाप………. 🥺❤️
(मराठी कविता)
धोतरातला तो बाप माझा….💗💗💗 काष्ट्यातली ती माझी माय…… 💕💞💕
पोटचं पोरगं शिकावं यांच्याशिवाय त्यांना वाटतयं तरी काय..❓❓
सध्याची स्थिती पाहून मला लय बोचलं…….. 😞😔😞😔
आठवला तो दिवस अन् वाटलं ……..
उघड्यावर संसार चालवताना मायबापाच्या पायात काटं किती टोचलं🥺
सगळी म्हणतात काय केलयं माझ्यासाठी 🤔
……. जास्त नाही लेका पण चार चाबकं खाल्ली तुझ्या शाळेच्या पाटीसाठी 👉🏻📋📚📓📚
राब राब राबून लय केल्या तुझ्यासाठी चाकरा…..
बंगला काही नको त्यांना फक्त तुझ्या घरातला दे एक कोपरा🙏🏻🙏🏻🙏🏻
चांदण्या रातीत काळ्या आईच्या मातीत गिळली त्यानं भाकर…….. 🌙💫🌨️🙁
तुझ्यासाठीच केलतं नाही आली कधी सुस्तेची ढेकर ❌❌❌
आई दिवा घेऊन चालायची…🪔
बाप चिखल तुडवायचा……. ⏱️😔
चार पैसे मिळावेत म्हणून रातीचा दिवस करायचा…… 🌅🌄
कष्टाच्या ओढीने तो थकून गेलाय आता…..
लई मोठी शाळा शिकून त्याच्या चरणी ठेव माथा…… 🙇🏻♂️🙇♀️🙇♀️🙇🏻♂️
धन्य होईल बाप तुझा ओलावतील डोळं माईचं….. 🥺
आठवलं तो दिवस जेव्हा तू म्हणाला होता😇⏱️😇………👉🏻
माये…….आता काय खायाचं ?
बाप म्हणील शाब्बास पोरा डोक्यावरून हात फिरवील माय…….. 🤗🤗🤗🤗🤗
डोळ्यातनं कळंल त्यांच्या आता मी डोळं मिटायला तयार हाय…….. 👥??😭😭
शेवटच्या श्वासापर्यंत म्हणतील शाहाणं हाय बाळ माझं…… ☺️☺️😘☺️😘
पण तुला कधी कळणार……. ❓❓❓
देवापेक्षाही महान आहेत आई बाबा तुझं…….. ❤️💯💯
–कु. समृद्धी नीळ



