
प्रतिनिधी/वाशिंबे


करमाळा तालुक्यातील मौजे वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरावा वित्त आयोग अंतर्गत गावातील वीस सार्वजनिक ठिकाणी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर सरपंच तानाजी बापू झोळ याच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसवण्यात आले. याचा शुभारंभ सोमवार दि.१३ नोव्हेंबर रोजी वाशिंबे येथील ह.भ.प.धनाजी महाराज जगदाळे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाहून करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच अमोल पवार, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, धोंडीराम कळसाईत, श्रीहरी टापरे, राहुल शिंदे, तसेच मनोज झोळ, आनंद झोळ, शैलेश झोळ, हनुमंत निंभोरे, निलेश कुलकर्णी, गणेश पाटील, देविदास राऊत, अशोक ननवरे आदी इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



