
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


गौंडरे (ता. करमाळा) येथील डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालय गौंडरे येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी स्वातंत्र्य दिनानिमित्त गौडरे गावचे माजी पोलीस पाटील देविदास कृष्णा हनपुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदी, इंग्रजी व मराठी भाषेतून उत्कृष्ट भाषणे झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वसंत शंकर अंबारे यांनी स्वीकारले तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव दादासाहेब सांगडे व संस्थेचे अध्यक्ष उमराव बापू रणमोडे तसेच गौंडरे गावचे सरपंच सुभाष नाना हनपुडे पालक वर्गातून बाळासाहेब भालेकर, पांडुरंग शिंदे, महादेव काळे, दशरथ ननवरे, भाऊसाहेब हनपुडे, ज्योतीराम कापले, वसुंधरा ग्रुप गौंडरे, गंगाराम माने व त्यांचे सर्व सहकारी, गंगाराम हनपुडे, नरहरी शिंदे, अशोक हनपुडे असे अनेक मान्यवर व नेरले, आवटी, निमगाव, कोळगाव, हिवरे, हिसरे येथील मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. नरहरी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले, देश रक्षणासाठी भारतीय सैन्यांचे महत्त्व पटवून दिले. येणाऱ्या भावी काळामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवावे अशा प्रकारचा आशावाद व्यक्त केला. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर बहारदार नृत्य सादर केली. यामध्ये टिपरी नृत्य, लेझीम नृत्य सादर केले. या कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता, त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. वसुंधरा ग्रुप गौंडरे तर्फे वृक्षारोपण केले.

मार्च २०२३ झालेल्या एसएससी बोर्ड परीक्षेत प्रशालेमध्ये प्रथम तीन क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याना कै. श्रीरंग रणमोडे यांच्या स्मरणार्थ बक्षीसे देण्यात आली. तर खडे सर यांच्याकडून प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला एक हजार एक रुपये देण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक सांगडे सर यांच्याकडून त्यांचे वडील कै. विष्णू नाना सांगडे व त्यांच्या मातोश्री रुक्मिणी वहिनी सांगडे यांच्या स्मरणार्थ मार्च २०२४ मध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यास सात हजार एक द्वितीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यास पाच हजार एक तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यास तीन हजार एक रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक सांगडे सर, रणमोडे सर, जगदाळे सर, पवार सर, नाळे सर, गायकवाड सर, गोफणे सर, खाडे सर, अंबारे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सहकार्य केले.



