
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील फिसरे गावात नेहमीच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतो. सध्या पावसाने ओढ दिल्याने ऐन पावसाळ्यात शाळेतील पिण्याच्या पाण्याचा बोअरवेलचे पाणी कमी आल्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी टंचाई भासू लागली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर गावातील शिव साम्राज्य युवा प्रतिष्ठान तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रोज फिल्टर पाण्याचे पाच जार मोफत देण्याची सोय करण्यात आली असून गरज भासल्यास आणखी जार ची व्यवस्था करू असा शब्द कार्यकर्त्यांनी दिला.
या कौतुकास्पद कार्याबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत तसेच फिसरे ग्रामस्थ यांच्याकडून शिव साम्राज्य युवा प्रतिष्ठान चे कौतुक करण्यात येत आहे.
शिव सम्राज्य युवा प्रतिष्ठान कडूनही असेच सामाजिक कार्यात कायम अग्रेसर राहील असे सांगण्यात आले




