
करमाळा/प्रतिनिधी


केम (ता. करमाळा) येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी केम गावचे सरपंच आकाश भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापक कदम एस. बी सर, पर्यवेक्षक सांगवे बी.व्ही सर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी लॉन्ग मार्चिंग परेड प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिवाजी उत्तरेश्वर तळेकर, उत्तरेश्वर जनार्दन तळेकर यांच्यातर्फे प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. तसेच शालेय पोषण आहार मध्ये विद्यार्थ्यांना भात, सांबर, लापशी चा अल्पोहार देण्यात आला. याचे नियोजन पवार टी व्ही सर यांनी केले. लॉंग परेड, मार्चिंग संचलन आणि स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन के.एन वाघमारे सर यांनी केले. तर सर्वांचे आभार पी. डी कोंडलकर सर यांनी मानले.
यावेळी दिलीपदादा तळेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच श्री उत्तरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद तळेकर व सर्व सदस्य, केम पोलिस स्टेशनचे जाधव साहेब, प्रहार संघटनेचे संदीप तळेकर, भाजपा केम शहर अध्यक्ष गणेश आबा तळेकर, सुयश क्लासेस चे संस्थापक वसंत तळेकर सर, मनोजकुमार सोलापूरे साहेब, उत्तरेश्वर देवस्थान विश्वस्त, सर्कल भाऊसाहेब, तलाठी भाऊसाहेब, ग्रामसेवक, भीमराव पेटकर, पोळके साहेब, किरण तळेकर, मुलानी चाचा, भीमराव चौगुले तसेच केम पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




