-->
करमाळाविशेष

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा व तालुका निवडी जाहीर

 

माढा/प्रतिनिधी

 

टेंभुर्णी (ता. माढा) येथील अकलूज रस्त्यावरील गोविंद वृद्धाश्रम येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांच्या हस्ते व महिला जिल्हा अध्यक्ष विजया कर्णवर यांच्या उपस्थितीत रविवार दि. २५ जून रोजी सोलापूर जिल्हा व तालुका निवडी जाहीर करण्यात आल्या.

 

यावेळी सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी शिवाजी पांडुरंग मोरे, सोलापूर जिल्हा सचिव पदी प्रमोद राऊत, सोलापूर जिल्हा सहसचिव पदी मारुती दादा शिंदे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नौशाद मुलाणी यांच्या जिल्हा पदावर निवडी करण्यात आल्या.

 

तसेच तालुका पातळीवर शशिकांत कडबाने माळशिरस तालुकाध्यक्ष, किरण येडगे माळशिरस तालुका उपाध्यक्ष, रमेश साळवे माळशिरस तालुका सचिव, किशोर इनामदार अकलूज शहराध्यक्ष, अजय लांडगे अकलूज शहर उपाध्यक्ष, मोहित लक्ष्मण बागडे यांच्या तर करमाळा तालुका सचिव पदी अंगद भांडवलकर, करमाळा तालुका सल्लागार पदी हर्षवर्धन गाडे, सहसल्लागार सुनील चांदणे, माढा तालुकाध्यक्ष पदी गणेश रिकिबे, माढा तालुका उपाध्यक्षपदी सुनील चेळेकर, मंगळवेढा रवी ढोबळे, सोलापूर शहराध्यक्ष पदी इस्माईल पठाण, बार्शी तालुकाध्यक्ष कन्हैया लांडगे, अकलूज शहर सचिव प्रमोद राऊत, टेंभुर्णी सचिव शिवाजी मोरे, माढा तालुका सरचिटणीस पदी संतोष पांढरे, माढा तालुका सल्लागार पदी युवराज जगताप, करमाळा तालुका अध्यक्षपदी प्रवीण अवचर, करमाळा शहर उपाध्यक्षपदी मारुती शिंदे, करमाळा तालुका सहसचिव पदी संदीप भागवत, कुर्डूवाडी कार्याध्यक्षपदी गणेश करमाळकर, अकलूज सहसचिवपदी प्रवीण सावंत, सांगोला तालुकाध्यक्ष पदी सुनील चेळेकर, मंगळवेढा तालुकाध्यक्ष पदी कन्हैया लांडगे, अकलूज शहर सचिव पदी या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close