
करमाळा/प्रतिनिधी


महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण अध्यात्मिक, संस्कार आणि संस्कृतीचा अनोखा उत्सव अर्थात “आषाढी एकादशी” चा वैष्णव सोहळा होय. हाच सोहळा याची देही याची डोळा साजरा करण्यासाठी लाखो वारकरी “पायी दिंडी” ने प्रतिवर्षी श्री क्षेत्र पंढरपूर येथे जातात. याच अनोख्या संस्कार आणि संस्कृतीची ओळख व्हावी आणि बालवयात प्रत्यक्ष अनुभूती मिळावी. या हेतूने आज गुरुवार दि. २९ जून रोजी कुगांव (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “दिंडी उत्सव” चे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी दिंडी उत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक असलेली वारकरी वेशभूषा परिधान करून शाळेतील विद्यार्थ्यांनी अध्यात्मिक संस्कृती आत्मसात केली. विठ्ठल-रुखमाईचा वेष परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. रिंगण सोहळा, फुगडी, टाळ वादन आदी कार्यकृती अत्यंत लक्षवेधक ठरल्या.
यावेळी सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेवजी अवघडे, कुगांव चे माजी उपसरपंच इन्शुसजी सय्यद साहेब, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब डोंगरे, कुगांव चे युवा कार्यकर्ते श्री. सागर पोरे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुभाष मंगवडे सर, श्री. दादा सय्यद सर, श्री. नवनाथ मारकड सर, श्री. दादाभाऊ येवले सर, श्री. बापूराव चव्हाण सर, अंगणवाडी सेविका कामटे मॅडम, शिंदे मॅडम, सर्व विद्यार्थी, पालक व आदी ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.



