-->
करमाळासामाजिक

आषाढी एकादशीमुळे दुसऱ्या दिवशी कुर्बानी करावी; तांबोळी बंधूंचे तालुक्यातील मुस्लिम बांधवांना आवाहन

करमाळा शहरात हिंदू मुस्लिम ऐकतेचे दर्शन घडवा; तांबोळी यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन

 

करमाळा/प्रतिनिधी

 

गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा सण बकरी ईद तसेच हिंदू धर्मीयांचा आषाढी एकादशी हे दोन्ही महत्त्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत. या दिवशी हिंदु धर्मीयांमध्ये पवित्र समजली जाणारी आषाढी एकादशी असल्याने मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करून हिंदु-मुस्लिम राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा. तसेच हिंदू-मुस्लिम एकतेचे आगळे वेगळे दर्शन घडवावे. असे आवाहन मुस्लिम समाजाचे तालुका अध्यक्ष तसेच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रांतिक अध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत केले आहे. या प्रसंगी राष्ट्रवादीचे नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी, आतिक बेग, खलील बागवान, इदाज वस्ताद आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी अधिक माहिती देताना हाजी उस्मान शेठ तांबोळी म्हणाले की, करमाळा शहर आणि तालुक्यात गेली कित्येक वर्षापासून हिंदू मुस्लिम एकोपा आहे. आजही शहर व तालुक्यात विविध सण, धार्मिक कार्यक्रम व उत्सवामध्ये हिंदू मुस्लिम बांधव एक दिलाने सामील होतात. त्याप्रमाणेच येत्या २९ जून रोजी बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन्ही महत्त्वाचे सण गेल्यावर्षी सारखेच याही वर्षी एकत्र आले आहेत. गतवर्षाप्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधवांनी मनाचे मोठेपण करीत हिंदू बांधवांच्या आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न करता ईदच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कुर्बानी करावी. असे आवाहन श्री तांबोळी यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले.

 

यावेळी पुढे बोलताना श्री तांबोळी म्हणाले की, एकादशीच्या आठ दिवस अगोदर तसेच त्या दिवशी राज्यभरातील अनेक संतांच्या दिंड्या करमाळा शहरातून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. यामुळे वारकरी संप्रदायाचा आदर ठेवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी कुर्बानीच्या (बकरी ईद) दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करावी, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close