
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरात मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर करमाळा येथील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयात लोकसभा प्रवास प्रभारी जयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (दि. ११ जून) रोजी बैठक संपन्न झाली.
या प्रसंगी जयकुमार शिंदे यांनी भाजपाच्या मोदी @9 या कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे? व हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी मोदी @9 चे सर्व कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात राबवणार असून मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी गेल्या नऊ वर्षामध्ये देशाचा केलेला विकास जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले.
या बैठकीसाठी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, मकाई कारखान्याचे संचालक हरिभाऊ झिंजाडे, आजिनाथ कारखान्याचे संचालक विठ्ठलराव शिंदे, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, बिटरगावचे सरपंच अभिजीत मुरूमकर, वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे, जातेगावचे सरपंच छगन ससाने, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, तालुका प्रसिद्धी प्रमुख जयंत काळे पाटील, नितीन झिंजाडे, मच्छिंद्र फंड, संजय अण्णा घोरपडे, जितेश कटारिया, महिला आघाडीच्या राजश्री खाडे, संगीता नष्टे, सोमनाथ घाडगे, धर्मराज नाळे, किरण शिंदे, विष्णू रणदिवे, राजू पवार, प्रकाश ननवरे, किरण बागल, संदीप काळे, नितीन निकम, नानासाहेब अनारसे, राजेश पाटील, विशाल घाडगे, अजय डौले, हर्षद गाडे, दत्तात्रय गाडे, सुनील जाधव, भैया कुंभार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



